मराठी समानार्थी शब्द
मराठी समानार्थी शब्द | Marathi samanarthi shabd
समानार्थी शब्द मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. मराठी व्याकरण समानार्थी शब्द शिकून आणखी चांगले करता येते. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, उदा. MPSC समानार्थी शब्द पाठ करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी मराठी शब्दकोश किंवा विश्वकोश वापरणे सर्वांनाच शक्य होत नाही. आणि आजकाल पुस्तके खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे आम्ही इथे मराठी समानार्थी शब्द यादी स्वरुपात देत आहोत. इथे आम्ही सातत्याने नवनवीन शब्द समाविष्ट करत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मराठी शब्दांचे अर्थ माहित होतील. लवकरच मराठी समानार्थी शब्द PDF स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
या शब्दांचा शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच उपयोग होईल. त्याचबरोबर तलाठी परीक्षा, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, इत्यादी स्पर्धा परीक्षांचा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होईल. तसेच शिक्षकांनाही उपयुक्त ठरतील असे समानार्थी शब्द इथे दिले आहेत.
- अंगार - निखारा
- अंत - शेवट, अखेर
अंतर्धान - अदृश्य, लुप्त
- अंथरूण - बिछाना
- अंधार - काळोख, तिमिर, तम
- अकस्मात - अचानक
- अग्नी - आग, अनल, विस्तव, पावक, वह्नी, वैश्वानर
- अडाणी - अशिक्षित, निरक्षर, अज्ञानी, मूर्ख
- अत्याचार - अन्याय
- अन्न - खाद्य, आहार, भोजन
- अपंग - पंगू, अधू, दिव्यांग, विकलांग
- अभिनय - हावभाव, अंगविक्षेप
- अभिनव - नव, नवीन, अनोखा
- अभिनेता - नट
- अभियान - मोहीम
- अभ्यास - सराव, अध्ययन, व्यासंग, परिशीलन
- अमित - असंख्य, अगणित, अमर्याद, अपार
- अमृत - सुधा, पीयूष
- अरण्य - रान, कानन, वन, विपिन, जंगल
- अर्जुन - पार्थ, धनंजय, फाल्गुन
- अलंकार - भूषणे, दागिने
- घोडा - अश्व, हय, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी
- आंधळा - अंध, दृष्टीहीन
- आई - जननी, माता, माय, माऊली, जन्मदात्री, मातोश्री, जन्मदा
- आकाश - गगन, अंबर, व्योम, नभ, तारागण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
- आठवण - स्मरण, स्मृती
- आनंद - हर्ष, मोद, संतोष, उल्हास, तोष
- आवाज - ध्वनी, रव, नाद
- आवाहन - विनंती
- आश्चर्य - नवला, विस्मय, अचंबा
- आहार - भोजन, खाद्य
- इंद - देवद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्राक्ष
- इच्छा - कामना, अभिलाषा, आकांक्षा, मनीषा
- इशारा - सूचना, खूण
- उजेड - प्रकाश, तेज, आभा, प्रभा
- उत्तेजन - प्रोत्साहन
- उत्सव - सोहळा
- उदरनिर्वाह - चरितार्थ
- उदास - नाराज, खिन्न, दुःखी
- उपहार - भेटवस्तू, नजराणा
- उशीर - विलंब
- ऊन - सूर्यप्रकाश
- ओळ - रांग, पंगत
- ऋषी - मुनी, साधु
- औषध - दवा, उपाय
- कनक - सोने, कांचन, हेम
- कपाळ - ललाट, भाल, निढळ
- कमळ - पद्म, अंबुज, राजीव, पुष्कर, पंकज, नीरज, नलिनी, अब्ज, सरोज
- करमणूक - मनोरंजन
- कविता - काव्य. पद्य
- कष्ट - मेहनत, श्रम
- कान - कर्ण, श्रवण, श्रोत्र
- काळजी - चिंता, फिकीर, विवंचना
- कावळा - काक, एकाक्ष, वायस
- किनारा - काठ, तीर, तट
- किरण - कर, अंशू, रश्मी
- किल्ला - गड, दुर्ग
- कुत्रा - श्वान
- कोठार - भांडार
- कौशल्य - नैपुण्य
- गंध - वास, परिमळ
- गणपती - गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विघ्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, वक्रतुंड, व्यंकटेश
- गरज - निकड, जरुरी, आवश्यकता
- गरम - उष्ण, तप्त
- गर्व - घमेंड, अहंकार, ताठा
- गाढव - खर, गर्दभ, रासभ
- गाय - गोमाता, धेनू, गो
- गाव - खेडे, ग्राम
- गीत - गाणे
- गुन्हा - अपराध
- गुप्त - अदृश्य, लपलेला, अंतर्धान
- गौरव - अभिनंदन, सन्मान
- घर - गृह, भवन, आलय, सदन, गेह, निकेतन, निवास, धाम
- घास - कवळ, ग्रास
- चंद्र - शशी, सुधाकर, रजनीनाथ, सोम, इंदू, सुधांशू, निशानाथ, शशांक, विधु, हिमांशू
- चड्डी - विजार, इजार, पायजमा
- चप्पल - पादत्राण, वहान, पादुका, खेटर
- चरबी - मेद, मांदे
- चव - स्वाद
- चवदार - चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर
- चांदणे - ज्योत्स्ना, कौमुदी, चंद्रिका
- चातुर्य - हुशारी
- चेहरा - मुख, तोंड, वदन, आनन, तुंड, मुद्रा
- छंद - नाद, आवड
- जंगल - वन, अरण्य, विपिन, कानन, रान
- जखम - दुखापत
- जखमी - जायबंदी
- जग - दुनिया
- जमीन - भू, भूमी, भुई, धरा
- जरब - दरारा, दहशत, वचक, धाक
- जलद - लवकर
- जास्त - भरपूर, मुबलक, चिक्कार, अतिशय
- जीभ - जिव्हा, रसना
- जीर्ण - जुने
- जेठ - मोठा
- झडकरी - लवकर
- झरा - निर्झर
- झाड - वृक्ष, तरू, पादप, द्रुम, रूख
- झुंज - लढा, संघर्ष, झगडा
- झुंबड - गर्दी, दाटी, रीघ
- झेंडा - ध्वज, निशाण, केतू
- झोत - प्रवाह, धारा
- झोप - निद्रा, शयन, नीज
- झोपडी - कुटी, खोपटे
- डोके - शीर, माथा, मस्तक, मुर्धा, शीर्ष, टाळके
- डोळा - नयन, लोचन, नेत्र, अक्ष, चक्षू
- डौल - दिमाख, ऐट, रुबाब
- ढग - मेघ, पयोधर, अभ्र, जलद, अंबुद, पयोद, नीरद, अब्द, घन
- ढेकूण - मत्कुण, खटमल
- तमा - पर्वा, फिकीर
- तरंग - लहर, लाट
- तराजू - तुला, तागडी
- तरुण - जवान, युवक, युवा
- तलवार - खड्ग, समशेर
- तलाव - तळे, तटाक, सारस, कासार, तडाग
- तहान - तृष्णा
- तारे - तारका, चांदण्या, नक्षत्रे
- तुरुंग - कैदखाना, बंदीखाना, कारागृह, जेल
- तोंड - मुख, चेहरा, वदन, आनन, तुंड
- तृप्ती - समाधान, संतोष
- थंड - शीत, शीतल, गार
- थाट - रुबाब, ऐट, तोरा
- दंगा - गोंधळ, गडबड, दंगल, मस्ती, गोंगाट
- दया - करुणा, कणव, कीव
- दहिवर - दव, दवबिंदू
- दात - दंत
- दाद - नोंद, दखल
- दिवस - दिन, वार, वासर, अह
- दुपार - मध्यान्ह
- दुफळी - यादवी, दुही
- दूध - दुग्ध, पय, क्षीर
- दृष्टी - नजर, निगाह
- देह - शरीर, तनू, तन, काया, वपू
- धन - पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा, दौलत
- धनुष्य - चाप, कोदंड, कमठा, धनू, कार्मुक
- ध्यास - वसा, वेड
- नट - अभिनेता
- नदी - सरिता, तटिनी, जीवनदायिनी, तरंगिणी
- नफा - फायदा, लाभ
- नमस्कार - प्रणाम, नमन, प्रणिपात, अभिवादन, वंदन
- नवरा - पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत, भर्ता
- निर्मळ - शुद्ध
- निश्चय - निर्धार
- नोकर - चाकर, सेवक, दास
- पंख - पर
- पंडित - तरबेज, निष्णात
- परवानगी X मुभा, मोकळीक, संमती
- पक्षी - पाखरू, विहंग, अंडज, खग, द्विज, विहग
- पत्नी - सहचारिणी, बायको, दारा, भार्या, कलत्र, अर्धांगी, कांता, जाया
- पथ - रस्ता, मार्ग
- पदार्थ - वस्तू, जिन्नस
- पराक्रम - शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी
- पर्वत - अचल, गिरी, नग, शैल, अद्री
- पाऊस - वर्षा, वृष्टी
- पाणी - जल, उदक, नीर, सलील, वारी, जीवन, पय, अंबू, तोय
- पान - पल्लव, पर्ण, पत्र
- पाय - पद, पाद, चरण
- पायजमा - विजार, पायजमा, सुर्वार, चोळणा, पाटलोण
- पुढारी - नेता, नायक, अग्रणी
- पुरस्कार - किताब, पारितोषिक
- पुरुष - नर, मर्द
- पृथ्वी - वसुंधरा, भूमी, धरणी, वसुधा, मही, धरती, धरित्री, भू, धरा, क्षमा, रसा
- पोपट - राघू, रावा, शुक, कीर
- पोरकी/पोरका - अनाथ
- प्रघात - चाल, पद्धत, रीत, रिवाज
- प्रजा - लोक, रयत
- प्रवीण - निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निष्णात
- प्रसिद्ध - प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात
- प्राचीन - पुरातन
- प्राणी - पशू, जनावर, श्वापद
- प्रासाद - वाडा, राजवाडा
- प्रेम - प्रीती, लोभ, अनुराग, माया
- फूल - पुष्प, सुमन, सुम, कुसुम
- बळ - जोर, शक्ती, ताकद, सामर्थ्य
- बळकट - खंबीर, मजबूत
- बहीण - भगिनी, स्वसा, सहोदरा
- बाकी - उरलेले, शिल्लक, शेष
- बाग - बगीचा, उद्यान, वाटिका, उपवन
- बाण - शर, तीर, सायक
- बातमी - वृत्त, वार्ता, खबर
- बाप - पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता
- बासरी - मुरली, वेणू
- बिकट - कठिण, अवघड
- बेडूक - मंडूक, दर्दूर
- बैल - वृषभ, पोळ, सांड
- बोट - अंगुली
- बोभाटा - गवगवा, बभ्रा
- ब्रह्मदेव - ब्रह्मा, चतुरानन, कमलासन, विरंची, विधी, प्रजापती
- ब्राह्मण - द्रविज, विप्र
- ब्रीद - बाणा, व्रत, वचन, निष्ठा
- भक्कम - मजबूत
- भरभराट - उत्कर्ष, प्रगती, समृद्धी
- भांडण - तंटा, कलह, झगडा, कज्जा
- भाऊ - बंधू, भ्राता, सहोदर
- भुंगा - भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भृंग
- भूक - क्षुधा
- मठ्ठ - मंद, मंदबुद्धी, ढ
- मन - चित्त, अंतर, अंतःकरण, मानस
- मला - मज
- महान - महा, मोठा
- महाल - राजवाडा, प्रासाद
- माती - मृदा
- माणूस - मनुष्य, मनुज, मानव
- मासा - मीन, मत्स्य
- मित्र - सखा, सोबती, सवंगडी, स्नेही, दोस्त
- मुनी - ऋषी, साधू
- मुलगा - पुत्र, तनय, सुत, नंदन, लेक, आत्मज, तनुज
- मुलगी - पुत्री, तनया, सुता, लेक, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहिता, नंदिनी
- मेंदू - मस्तिष्क
- मृत्यू - मरण, निधन, देहावसान
- यज्ञ - याग, होम, मख
- युद्ध - लढाई, लढा, संगर, संग्राम, समर, झुंज, रण
- रवा - कण
- रस्ता - पथ, मार्ग, सडक, वाट, पंथ
- रक्षक - शिपाई, पहारेकरी
- राग - क्रोध, संताप, त्वेष, त्रागा, रोष, कोप
- राजा - भूप, नृप, भूपाळ, नरेश, भूपती, नृपती, राय, लोकपाल, नरेंद्र, भूपाल, भूमिपाल, पृथ्वीपती, प्रजापती, भूपेंद्र
- रात - रजनी, यामिनी, निशा
- रुचि - आवड
- लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
- लघुता - लहान, कमीपणा
- लय - नाश
- लेंगा - पायजमा
- लोभ - मोह, आमिष, लालूच
- वर्तन - वागणूक
- वस्त्र - कापड, वसन, अंबर, पट
- वाईट - बेकार, घाण
- वाकडे - वक्र
- वाघ - व्याघ्र, शार्दूल
- वाचा - वाणी
- वानगी - उदाहरण, दाखला
- वानर - मर्कट, कपि, शाखामृग
- वारा - वात, वायू, पवन, अनिल, समीर, मरुत, समीरण
- विद्या - शिक्षण, ज्ञान
- विष्णू - श्रीपती, रमापती, रमेश, चक्रपाणि, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंद, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरुषोत्तम, वासुदेव, हृषिकेश, पद्मनाभ, पीतांबर, शेषशायी
- विस्तव - जाळ
- विहार - क्रीडा, सहल, भ्रमण
- विहीर - आड, कूप
- विक्षिप्त X विचित्र, तऱ्हेवाईक
- वीज - बिजली, विद्युत, चपला, तडिता, चंचला, विद्युल्लता, सौदामिनी
- वेदना - यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ
- वेल - लता, लतिका, वल्ली
- शंकर - महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र
- शक्ती - ताकद, जोम, जोर, सामर्थ्य
- शत्रू - वैरी, अरी, रिपू
- शरीर - देह, तनू, काया, अंग, वपु
- शहर - पूर, पुरी, नगर
- शील - चारित्र्य, सदाचार
- शुद्ध - निर्भेळ
- शेतकरी - कृषक, कृषीवल, कुणबी, किसान
- शेष - अनंत, वासुकी
- संघर्ष - कलह, झगडा, भांडण
- संत - सज्जन
- संध्याकाळ - सायंकाळ, सांज, दिनशेष
- संसर्ग - स्पर्शबाधा
- संहार - नाश, विनाश, सर्वनाश
- सकल - समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळे, संपूर्ण
- सकाळ - प्रभात, उषा, प्रातःकाळ, पहाट
- समाज - समुदाय, लोक, जनसमूह
- समुद्र - दर्या, सागर, सिंधू, जलधी, जलनिधी, पयोधी, रत्नाकर, उदधी, अर्णव, अंबुधी, वारिराशी
- सह्याद्री - सह्यपर्वत, सह्याचल, सह्यगिरी
- साधा - भोळा, सरळ, सरळमार्गी
- साधू - संन्यासी
- सानुली - लहानशी
- साप - भुजंग, सर्प, अही, उरग
- सार - सारांश, तात्पर्य
- सावध - दक्ष, जागरूक
- सिंह - शार्दूल, केसरी, वनराज, मृगेंद्र, पंचानन, मृगराज
- सीमा - वेस, हद्द, मर्यादा, शीव
- सुंदर - सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम, देखणे, मनोरम
- सुगंध - सुवास
- सुरुवात - आदि, आरंभ, प्रारंभ
- सुरेल - गोड, मधुर
- सूर्य - रवी, दिनकर, भास्कर, आदित्य, सविता, मार्तंड, मित्र, दिनमणी, वासरमणी, प्रभाकर, अर्क, भानु, चंडांशू, दिवाकर, सहस्रकर, सहस्ररश्मी
- सेनापती - सेनानी, सेनानायक
- सेवक - नोकर, दास, चाकर
- सेवा - चाकरी
- सैराट- चंचल, बिथरलेला
- सोने - सुवर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य
- स्तुती - प्रशंसा, कौतुक
- स्त्री - नारी, महिला, ललना, कामिनी, वनिता, अबला, अंगना
- स्वच्छंदी - स्वैर, मुक्त
- हत्ती - गज, कुंजर, गजराज, हस्ती, वारण, नाग
- हृदय - काळीज, अंतःकरण, अंतर
- हरिण - मृग, सारंग, कुरंग
- हल्ला - हमला, चाल, लढाई
- हाडे - अस्थी
- हात - हस्त, कर, बाहू, भुज, पाणि, बाहु
- हिंस्त्र - क्रूर, जंगली
- हुशार - चतुर, चाणाक्ष
- होडी - नाव, नौका, तर
- क्षेम - कल्याण, हित, कुशल
- ज्ञाता - सुज्ञ, शहाणा, जाणपारा, तज्ञ, ज्ञानी
- ज्ञान- शिक्षण, विद्या
0 टिप्पण्या