मराठी वाक्प्रचार
मराठी भाषेवर
प्रभुत्व मिळवण्यासाठी मराठी वाक्प्रचार आणि म्हणी यांची माहिती असणे अत्यंत
आवश्यक आहे. या पानावर आम्ही मराठी वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ देत आहोत. पण त्या
आधी वाक्प्रचार म्हणजे काय? हे समजून घेतले
पाहिजे. प्रत्येक भाषेत असे काही शब्द/शब्दसमूह असतात की ज्यांचे दर्शनी अर्थ आणि
खरे अर्थ खूप वेगवेगळे असतात. उदा. अंगाचा तिळपापड होणे. खरे तर अंगाचा तीळ होणे
किंवा अंगाचा पापड होणे शक्य नसते. हा दर्शनी अर्थ व्यवहारात काहीच कामाचा नसतो.
इथे या शब्दसमूहाचा प्रत्यक्ष अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. तो आहे- अतिशय संताप येणे.
असे सगळ्या भाषांमध्ये असते. भाषेची समज चांगली वाढण्यासाठी वाक्प्रचार पाठच करणे
आवश्यक आहे. तसेच वाक्प्रचार कसे वापरावे? हे
सुद्धा समजले पाहिजे. त्यांचे सतत वाचन आणि वापर करत राहिल्यास आपली भाषेची समज
चांगली वाढते.शिष्यवृत्ती
परीक्षा देणारे विद्यार्थी, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांनाच या संग्रहाचा फायदा होईल अशी
अपेक्षा आहे.
अंगवळणी पडणे - सवय होणे
अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप
येणे
अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने
क्षुब्ध होणे
अंगावर काटा उभा राहणे - भीतीने
अंगावर शहारे येणे
अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता
वाटणे
अंजारणे-गोंजारणे - मायेने कुरवाळणे
अंथरूण पाहून पाय पसरणे - ऐपतीनुसार
खर्च करणे
अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला
उतरणे
अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा
पराक्रम गाजवणे
अठरा विश्वे दारिद्र्य असणे -
पराकोटीचे दारिद्र्य असणे
अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे
अत्तराचे दिवे लावणे - भरपूर
उधळपट्टी करणे
अधीर असणे - उत्सुक असणे, बेचैन असणे
अन्नास जागणे - उपकार स्मपणे
अन्नास मोताद होणे - अत्यंतिक
दारिद्र्यात जगणे, उपासमार होणे
अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन
मिळवून देणे
अभय देणे - भीती नाहीशी करण्यासाठी
धीर देणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे -
थोड्याशा यशाने चढून जाणे
अर्पण करणे - देऊन टाकणे
अलिंगन देणे - मिठी मारणे
अवशेष उरणे - शिल्लक राहणे
अस्वस्थ होणे - चलबिचल होणे
आकांडतांडव करणे - रागाने आदळाआपट
करणे
आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे
आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे
येणे
आकाशपाताळ एक करणे - फार मोठ्याने
आरडाओरड करून थैमान घालणे
आकाशाला गवसणी घालणे -
आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे
आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद
विकोपाला जाईल असे करणे
आगेकूच करणे - पुढे पुढे जाणे
आच लागणे - झळ लागणे
आचरण करणे - वागणे, वर्तन करणे
आधार नसणे - सांभाळणारे नसणे
आपल्या पोळीवर तूप ओढणे - दुसऱ्याचा
मुळीच विचार न करता, साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून
घेणे
आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट
येणे
आयुष्याचा शेवट करणे - मरण पत्करणे
आरशासारखे करणे - स्वच्छ करणे
आवड भागवणे - इच्छा पूर्ण करणे
आस्था वाटणे - कळकळ वाटणे
इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे
अवघड कार्य पार पाडणे
उंटावरून शेळ्या हाकणे - प्रत्यक्ष
कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे
उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे
उखाळ्यापाखाळ्या काढणे - एकमेकांचे
उणेदुणे काढणे किंवा दोष देणे
उचलबांगडी करणे - एखादयाला
जबरदस्तीने हलवणे
उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे
उदक सोडणे - एखाद्या वस्तूरील आपला
हक्क सोडून देणे
उद्घाटन करणे - प्रारंभ करणे
उद्ध्वस्त होणे - नाश पावणे
उधळून लावणे - विस्कटून टाकणे,
पळवून लावणे
उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे
उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन
पडणे
उराशी बाळगणे - मनात जतन करून ठेवणे
उलटी अंबारी हाती येणे - भीक
मागण्याची पाळी येणे
उलथून पाडणे - नष्ट करणे, बदलणे
उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी
कोणाला यत्किंचितही मदत न करणे
ऊत येणे - अतिरेक होणे
ऊर भरून येणे - गद्गदून येणे
एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब
निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे
ओळख पटणे - मोठेपणा समजणे
कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे;
उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे
कंठस्नान घालणे - ठार मारणे
कंबर कसणे - एखादया गोष्टीसाठी हिंमत
करून तयार होणे
कचरणे - घाबरणे
कचाट्यात सापडणे - तावडीत सापडणे
कटाक्ष टाकणे - डोळ्यांच्या कडेतून
नजर फेकणे
कडेलोट करणे - कड्यावरून ढककलून देणे
कणीक तिंबणे - खूप मार देणे
कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे
कपाळमोक्ष होणे - अपघाताने मरण पावणे
कपाळाला हात लावणे - हताश होणे,
नाराजी दाखवणे
करमणूक करणे - मनोरंजन करणे
काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही
असे दाखवणे
काट्याचा नायटा होणे - क्षुल्लक
गोष्टींचा भयंकर परिणाम होणे
काट्याने काटा काढणे - एकाद्या
शत्रूच्या साहय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे
कान टवकारणे - अगदी लक्षपूर्वक ऐकणे
कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात
किल्मिष निर्माण करणे
कानउघडणी करणे - कडक शब्दांत चूक
दाखवून देणे
कानांवर हात ठेवणे - माहीत नसल्याचा
बहाणा करणे
कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे
कानावर घालणे - सांगणे, ऐकवणे
कानावर पडणे - ऐकू येणे, सहजगत्या माहीत होणे
कानोसा घेणे - अंदाज घेणे, चाहूल घेणे
कामात मन असणे - कामात गुंग असणे
कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे
बदलणे
काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने
मन विदीर्ण होणे
कावराबावरा होणे - बावरणे
कुंपणाने शेत खाणे - ज्याच्यावर
जबाबदारी आहे अशा विश्वासघातील माणसाने फसवणे
कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट
स्थिती येणे
केसाने गळा कापणे - कपटरूपी प्रेम
दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे
कोंबडे झुंजवणे - दुसऱ्याचे भांडण
लावून आपण मजा पाहणे
कोपरापासून हात जोडणे - काहीही संबंध
न ठेवण्याची इच्छा प्रकट करणे
क्षमा मागणे - माफी मागणे
खंड न पडणे - सतत सुरू राहणे
खजील होणे - शरम वाटणे, लाज वाटणे
खटपट करणे - प्रयत्न करणे
खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे
खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे
खाजवून खरूज काढणे - मुद्दाम भांडण
उकरून काढणे
खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण
ठपका ठेवणे
खाल्ल्या घरचे वासे मोजणे - उपकार
करणाऱ्याचे वाईट चिंतणे
खूणगाठ बांधणे - पक्के ध्यानात ठेवणे
खो घालणे - विघ्न निर्माण करणे
गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस
गेल्यावर खूप समाधान वाटणे
गट्टी जमणे - मैत्री होणे
गर्क असणे - गुंतून राहणे, मग्न राहणे
गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे
गलबला होणे - गोंगाट होणे
गळ घालणे - अतिशय आग्रह करणे
गळ्यात धोंड पडणे - इच्छा नसताना
जबाबदारी अंगावर पडणे
गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड
घालणे
गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक
होणे
गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या
मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे
गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे;
एकदम पसार होणे
गुजराण करणे - निर्वाह करणे
गुण दाखवणे - (नकली स्वभाव टाकून)
खरे स्वरूप प्रकट करणे
गुदमरून जाणे - श्वास कोंडणे,
कोंडमारा होणे
गोडी असणे - रस असणे
गौडबंगाल असणे - गूढ गोष्ट असणे;
काहीतरी रहस्य असणे
घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे
घर चालवणे - कुटुंबाचा निर्वाह करणे
घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट
करणे
घर धुऊन देणे - सर्वस्वी लुबाडणे
घात करणे - नुकसान करणे
घाम गाळणे - खूप कष्ट करणे
घाम जिरवणे - कष्ट करणे
घालूनपाडून बोलणे - दुसऱ्याच्या
मनाला लागेल असे बोलणे
घोकंपट्टी करणे - पाठांतर करणे
घोकू लागणे - सारखे म्हणणे
घोटाळा होणे - गोंधळ होणे
घोडा मैदान जवळ असणे - एखाद्या
गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे
घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या
फायदयासाठी पुढे सरसावणे
घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे
घोडे मध्येच अडणे - प्रगतीत खंड पडणे
घोडे मारणे - नुकसान करणे
चंग बांधणे - निश्चय करणे
चकित होणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे
चतुर्भुज होणे - लग्न करणे; कैद होणे
चमकून पाहणे - चकित होऊन पटकन पाहणे
चव्हाट्यावर आणणे - उघडकीस आणणे;
जाहीर करणे
चाचणी घेणे - परीक्षा घेणे
चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार
बचत करणे
चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण
स्वातंत्र्य मिळणे
चाहूल घेणे - अंदाज घेणे, कानोसा घेणे
चिरडून टाकणे - मारून टाकणे
चेहरा पडणे - लाज वाटणे
चौदावे रत्न दाखवणे - मार देणे
छाती दडपणे - भिती वाटणे
जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या
रीतींनी प्रयत्न करणे; कमालीचा प्रयत्न करणे
जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे
जाळ्यात अडकवणे - पकडणे
जाहीर करणे - सर्वांना सांगणे
जिभेला हाड नसणे - वाटेल ते
बेजबाबदारपणे बोलणे
जिवाचा धडा करणे - पक्का निश्चय करणे
जिवाची मुंबई करणे - खूप चैन करणे
जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे
जिवात जीव येणे - (काळजी नाहीशी
होऊन) पुन्हा धैर्य येणे
जिवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे
जिवाला जीव देणे - एखाद्यासाठी प्राण
देण्यास तयार असणे
जिवावर उठणे - (एखाद्याचा) जीव
घेण्यास उद्युक्त होणे
जिवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर
अवलंबून राहून चैन करणे
जिवावर उदार होणे - प्राण देण्यास
तयार होणे
जीव अधीर होणे - उतावीळ होणे
जीव की प्राण असणे - प्राणाइतके
प्रिय असणे
जीव खाली पडणे - काळजीतून मुक्त होणे
जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास
तयार असणे
जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त
होणे
जीव तिळतिळ तुटणे - एखाद्या
गोष्टीसाठी तळमळणे
जीव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी
वाटणे
जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे;
हायसे वाटणे
जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी
कटाळून जाणे
जोड मिळणे - मदत मिळणे
जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन
करणे
झळ लागणे - (एखाद्या गोष्टीचा)
धोकादायक दुष्परिणाम भोगावा लागणे
झुंबड उडणे - गर्दी होणे
टक लावून पाहणे - एकसारखे रोखून
पाहणे
टाके ढिले होणे - हातोनात श्रम
झाल्यामुळे अंगी ताकद न राहणे
टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे
टेंभा मिरवणे - दिमाख दाखवणे
ठेका घेणे - मक्ता घेणे, कंत्राट घेणे
डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे
डाळ शिजणे - थारा मिळणे; सोय जुळणे; मनाजोगे काम होणे
डाव साधणे - संधीचा फायदा घेऊन कार्य
साधणे; योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळवणे
डोके चालवणे - युक्ती लढवणे
डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर
निष्कारण ठपका ठेवणे
डोक्यावर बसणे - फाजील लाड करणे
डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे
डोळा असणे - पाळत ठेवणे
डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे
नजरेला नजर देण्यास टाळणे
डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे
डोळे खिळणे - एकाच गोष्टीवर नजर
स्थिर होणे
डोळे खिळून राहणे - एखाद्या
गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे
डोळे झाकून जाणे - बिनधास्तपणे जाणे
डोळे दिपवणे - थक्क करून सोडणे
डोळे निवणे - समाधान होणे
डोळे पाणावणे - डोळ्यात पाणी येणे
डोळे फाडून पाहणे - तीक्ष्ण नजरेने
पाहणे; आश्चर्यचकित होऊन पाहणे
डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत
पाहणे
डोळे विस्फारणे - आश्चर्यचकित होणे
डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे
डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे
डोळ्यांत पाणी येणे - वाईट वाटणे,
रडणे
डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून
दुर्लक्ष करणे
डोळ्याचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान
होणे
डोळ्यात खुपणे - सहन न होणे
डोळ्यात तेल घालून राहणे - अतिशय
जागृत राहणे; दक्ष राहणे
डोळ्यात धूळ फेकणे - फसगत करणे
डोळ्यात प्राण आणणे - एखाद्या
गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे
डोळ्यातून थेंब न काढणे - मुळीच न
रडणे
तंतोतंत पाळणे - जसेच्या तसे करणे
तडाख्यातून निसटणे - तावडीतून निसटणे
तडीस नेणे - पूर्ण करणे
तमा नसणे - पर्वा नसणे
तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय
संताप होणे
तळहातावर शिर घेणे - जिवावर उदार
होणे
तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे -
मिळालेल्या संधीचा लाभ उठवणे; दुसऱ्यांच्या
कष्टावर आपला स्वार्थ साधणे
तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे
ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे
तिलांजली देणे - सोडणे; त्याग करणे
तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे;
नाहीसे होणे, निघून
जाणे
तोंड टाकणे - अद्वातद्वा बोलणे
तोंड देणे - सामना करणे
तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे
तोंड सुकणे - निस्तेज वाटणे
तोंडाचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे;
भयभीत होणे
तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे
तोंडातून ब्र न काढणे - एकही शब्द न
उच्चारणे
तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण
होणे, लोभ उत्पन्न होणे
तोंडाला पाने पुसणे - फसवणे
तोंडाशी पाडणे - विश्वासघात करणे
त्वेषाने तुटून पडणे - चिडून हल्ला
करणे
थांग न लागणे - कल्पना न येणे
थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी
लाचारी पत्करणे
थोबाड रंगवणे - तोंडात मारणे
दंड थोपटणे - आव्हान देणे
दंडवत घालणे - नमस्कार करणे
दगा देणे - फसवणे
दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर
होणे
दबकून असणे - घाबरून असणे
दबा धरून बसणे - टपून बसणे
दाखले होणे - येऊन मिळणे
दाढी धरणे - विनवणी करणे
दात धरणे - वैर बाळगणे; सुडा घेणे
दात विचकावणे - वेंगाडणे
दातओठ खाणे - द्वेषाची भावना दाखवणे
दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे
दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा
विनंती करून सांगणे
दातास दात लावून बसणे - काही न खाता
उपाशी राहणे
दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे
दाद न देणे - थांगपत्ता लागू न देणे;
पूर्णपणे दुर्लक्ष करणे
दाद मागणे - तक्रार करून किंवा
गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे
दाद लागू न देणे - माहीत पडू न देणे
दिंवगत होणे - मरण पावणे
दुःखावर डागण्या देणे - दुःख
झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे
दुधात साखर पडणे - अधिक चांगले घडणे
दुरभिमान बाळगणे - अयोग्य गोष्टीचा
अभिमान वाटणे
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे -
दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे
दोन हाताचे चार हात होणे - विवाह
होणे
द्राविडी प्राणायाम करणे - सोपा
मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
धडकी भरणे - खूप भीती वाटणे
धडपड करणे - कष्ट करणे
धरणे धरणे - हट्ट धरून बसणे
धाबे दणाणणे - खूप घाबरणे
धारण करणे - अंगीकारणे
धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू
येणे
धारातीर्थी पडणे - लढता लढता वीरमरण
येणे
धाव घेणे - मनाच्या ओढीने जाणे
धूम ठोकणे - पळून जाणे
धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे
ध्यानधारणा करणे - जप तप करणे
ध्यानी येणे - लक्षात येणे
न करमणे - मन न रमणे
न डगमगणे - न घाबरणे
नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद
होत असता बाह्यतः दुःख दाखवणे
नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे
नजर करणे - भेटवस्तू देणे
नजर चुकवणे - न दिसेल अशी हालचाल
करणे, फसवणे
नजर ठेवणे - लक्ष ठेवणे
नजरेत भरणे - लक्षात येणे, उठून दिसणे
नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
नांगी टाकणे - हातपाय गाळणे
नाक घासणे - स्वतःचे कार्य
साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे
नाक ठेचणे - नक्षा उतरणे
नाक मुरडणे - नापसंती दाखवणे
नाक वर असणे - ऐट, दिमाख किंवा ताठा असणे
नाकाने कांदे सोलणे - स्वतः मध्ये
दोष असूनही उगाच बढाया मारणे
नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे
वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे
नाकावर राग असणे - लवकर चिडणे
नाकाशी सूत धरणे - आता मरतो की
घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
नाकीनऊ येणे - मेटाकुटीला येणे;
फार त्रास होणे
नाद असणे - छंद असणे
नाव सोनेरी अक्षरात उमटणे - अजरामर
होणे, कीर्ती होणे
निपचित पडणे - हालचाल न करता राहणे
निरखून पाहणे - लक्षपूर्वक निरीक्षण
करणे
निर्बंध असणे - बंधने असणे
निश्चय करणे - निर्धार करणे, मनात पक्के ठरणे
पथ्य पाळणे - नियम पाळणे
पदमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा
पैसा खर्च करणे
पदरात घालणे - चूक पटवून देणे;
स्वाधीन करणे
पदरात घेणे - स्वीकारणे
पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला
भरमसाठ महत्त्व देणे
पसार होणे - पळून जाणे, पोबारा करणे
पांगापांग होणे - फाटाफूट होणे,
विस्कटणे
पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने
जाणे
पाचवीला पुजणे - आवश्यक गोष्टींची
कायमची सोबत असणे
पाठ थोपटणे - शाबासकी देणे
पाठ दाखवणे - पळून जाणे
पाठ देणे - धडे शिकवणे
पाठ न सोडणे - एखाद्या गोष्टीचा
पिच्छा पुरवणे
पाठबळ नसणे - आधार नसणे
पाठीशी घालणे - संरक्षण देणे
पाढा वाचणे - सविस्तर हकिगत सांगणे
पाणी दाखवणे - सामर्थ्य दाखवणे
पाणी पडणे - वाया जाणे
पाणी पाजणे - पराभव करणे
पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून
ठेवणे; गुप्त कट शिजत असणे
पाणी सोडणे - आशा सोडणे; त्याग करणे
पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे
पादाक्रांत करणे - जिंकणे
पाय न ठरणे - स्थिर न राहणे
पायमल्ली करणे - उपमर्द करणे
पायाखाली घालणे - पादाक्रांत करणे
पार
पाडणे - पूर्ण करणे
पालन करणे - पाळणे
पावती मिळणे - पसंती मिळणे
पित्त खवळणे - खूप राग येणे
पुंडाई करणे - दांडगाईने वागणे
पोटाची दामटी वळणे - खायला न मिळणे
पोटात कावळे कावकाव करणे - अतिशय भूक
लागणे; भुकेने जीव व्याकूळ होणे
पोटात घालणे - क्षमा करणे
पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप
खावेसे वाटणे
पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे
पोटाला चिमटा घेणे - पोटाला न खाता
राहणे
पोटावर पाय देणे - उदरनिर्वाहाचे
साधन काढून घेणे
पोटाशी धरणे - कुशीत घेणे, माया करणे
पोपटपंची करणे - अर्थ न समजता पाठ
करणे
पोरकी होणे - अनाथ होणे
प्रतिकार करणे - विरोध करणे
प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे
प्रश्न विचारणे
प्राण कानात गोळा होणे - ऐकण्यासाठी
अतिशय उत्सुक होणे
प्राण धोक्यात घालणे - जीव संकटात
टाकणे
प्राणापेक्षा जपणे - जीवापेक्षा
सांभाळणे
प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न
करणे
फडशा पाडणे - खाऊन टाकणे, संपवून टाकणे
फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण
करणे; एखादे काम टाळण्यासाठी हरकती काढणे
फितुरी करणे - शत्रूला गुप्त माहिती
पुरवणे
फुटाण्यासारखे उडणे - रागाने एकदम
एखाद्या कार्यास प्रवृत्त होणे
बचाव करणे - रक्षण करणे
बट्ट्याबोळ होणे - विचका होणे
बत्तिशी दाखवणे - हसणे
बत्तिशी रंगवणे - जोराने थोबाडीत
मारणे
बदला घेणे - सूड घेणे
बभ्रा करणे - बोंबाटा करणे; सगळीकडे प्रसिद्धी करणे
बस्तान बसवणे - जम बसवणे, स्थिर होणे
बादरायण संबंध असणे - ओढूनताणून
लावलेला संबंध असणे
बारा वाजणे - पूर्ण नाश होणे
बुचकाळ्यात पडणे - गोंधळून जाणे
बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ
न देणे
बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला
लागून राहणे
बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे
दुसऱ्याला वागायला लावणे
बोल लावणे - दोष देणे
बोलाफुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची
सहजासहजी एक वेळ जमून येणे
बोळ्याने दूध पिणे - बुद्धीहीन असणे
भंडावून सोडणे - हैराण करणे, बेजार करणे
भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने
प्रयत्न करणे
भयाची लाट पसरणे - भीतीचे वातावरण
होणे
भान नसणे - जाणीव नसणे
भानावर येणे - शुद्धीवर येणे
भारावून जाणे - मन भरून येणे
भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे
मदतीचा हात नसणे - साहाय्य नसणे
मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे
मधून विस्तव न जाणे - अतिशय वैर असणे
मन थक्क करणे - आश्चर्य वाटणे
मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी
बोलून दाखवणे
मन वळवणे - समजूत घालणे
मन वेधणे - मन आकर्षित होणे
मन साशंक होणे - मनात संशय वाटू
लागणे
मनात घर करणे - मनात कायमचे राहणे
मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य
करणे
मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे
मनावर घेणे - पूर्ण लक्ष देणे
मनावर ठसणे - मनावर जोरकसपणे बिंबणे
मनावर न घेणे - दुर्लक्ष करणे
मनावर भिनणे - मनात खोल मुरणे
मरणाला मिठी मारणे - स्वतःहून मरण
स्वीकारणे
मळभ दाटणे - मनात दुःख दाटून येणे
मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे
माग काढणे - शोध घेणे
मागावर असणे - पाळतीवर असणे
माघार घेणे - हार मानणे
मात करणे - विजय मिळवणे
मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे
मात्रा न चालणे - इलाज न चालणे
मान ताठ ठेवणे - स्वाभिमानाने वागणे
मार्ग काढणे - उपाय शोधणे
मार्ग सापडणे - रस्ता मिळणे
माशा मारणे - कोणताही उद्योग न करणे
मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे
मूग गिळणे - उत्तर न देता गप्प राहणे
मोह टाळणे - लोभ सोडणे
रंगत येणे - खूप मजा येणे
रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत
करणे
रद्द करणे - बाद करणे
रमून जाणे - गर्क होणे, गुंतून जाणे, तल्लीन होणे
राईचा पर्वत करणे - क्षुल्लक
गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे
राजी नसणे - खूश नसणे
राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे
राम नसणे - अर्थ नसणे
राम म्हणणे - शेवट होणे; मृत्यू येणे
लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे
लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची
कृपा असणे; श्रीमंती असणे
लष्कराच्या भाकऱ्या भाजणे -
दुसऱ्यांच्या उचापती करणे
लहान तोंडी मोठा घास घेणे - लहान
माणसाने थोरा मोठ्यांपुढे बोलणे
लाड करणे - कौतुक करणे
लालूच दाखवणे - मोहात पाडणे
लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे
वकीलपत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे
वचन देणे - शब्द देणे, शपथ घेणे
वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा
राग दुसऱ्यावर काढणे
वणवण भटकणे - एखादी गोष्ट
मिळविण्यासाठी खूप फिरणे
वतन राखणे - जमिनीची जपणूक करणे
वरमणे - ओशाळणे, शरमणे
वळण लावणे - सवय करणे
वळणावर आणणे - ताळ्यावर आणणे;
नम्र व्हायला लावणे
वाकुल्या दाखवणे - वेडावून दाखवणे,
चिडवणे
वाक्प्रचार - अर्थ
वाचा बसणे - एक शब्दही बोलता न येणे
वाट लावणे - विल्हेवाट लावणे;
मोडूनतोडून टाकणे
वाटाण्याच्या अक्षता लावणे -
स्पष्टपणे नाकारणे
वाली भेटणे - आधार देणारा भेटणे
विचलित होणे - मनाची चलबिचल होणे
विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा
करणे
विरश्री संचारणे - विजय मिळण्याची
उमेद निर्माण होणे
विलंब होणे - उशीर होणे
विसंवाद असणे - एकमेकांशी न जमणे
वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम
ढोंग करणे
वैभव लोपणे - श्रीमंती संपणे
शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ
जवळ येणे
शब्द जमिनीवर पडू न देणे -
दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबद्दल
चौकशी करून खात्री करून घेणे
शान वाढवणे - प्रतिष्ठा वाढवणे
शिगेला पोहोचणे - शेवटच्या टोकाला
जाणे
शुद्ध नसणे - भान हरपणे
शुद्ध हरपणे - बेशुद्ध पडणे
श्रीगणेशा करणे - आरंभ करणे
संगे नेणे - सोबत नेणे
संधान बांधणे - जवळीक निर्माण करणे
संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे
संमती देणे - होकार देणे
संयम पाळणे - मनाला आवरणे, मोह टाळणे
सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य
मार्गांचा अवलंब करणे
सर्वस्वाचा त्याग करणे - जीवन
समर्पित करणे
सळो की पळो करणे - अतिशय हैराण करणे
सहीसलामत सुटणे - दोष न घेता सुटका
होणे
साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे
साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान
प्राप्त होणे; खरेखुरे स्वरूप कळणे
साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे
करणे
साद देणे - हाक मारणे
सादर करणे - प्रत्यक्ष दाखवणे
सामील होणे - सहभागी होणे
सामोरे जाणे - निधड्या छातीने
(संकटास) तोंड देणे
सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा
लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे
सुळावर चढवणे - फाशी देणे
सूतोवाच करणे - पुढे घडणाऱ्या
गोष्टीची प्रस्तावना करणे; प्रारंभ करणे
सैरावेरा पळणे - वाट मिळेल तिथे पळणे
सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले
दिवस येणे
स्थापना करणे - निर्माण करणे
स्थायिक होणे - एक जागी राहणे
स्वप्न भंगणे - मनातील इच्छा पूर्ण न
होणे
स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने,
गर्वाने अतिशय फुगून जाणे
हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे
हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू
लागणे
हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी
स्तुती करून मोठेपणा देणे
हल्ला चढवणे - चढाई करणे
हळहळ वाटणे - चुकवणे, फसवणे
हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू
येणे
हस्तगत करणे - ताब्यात घेणे
हात ओला होणे - फायदा होणे
हात चोळणे - चरफडणे
हात जोडणे - नमस्कार करणे
हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी
अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाकून मोकळे होणे
हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार
घेणे
हात दाखवणे - बडवून काढून वा अन्य
प्रकारे आपले सामर्थ्य दाखवणे; इंगा दाखवणे
हात देणे - मदत करणे
हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने
एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
हात मारणे - ताव मारणे; भरपूर खाणे
हात हालवत परत येणे - काम न होता परत
येणे
हातपाय गळणे - धीर सुटणे
हातभार लावणे - मदत करणे
हातवारे करणे - हात हलवून इशारे करणे
हाताचा मळ असणे - सहज शक्य असणे
हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे
हातापाया पडणे - गयावया करणे
हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत
न घेता फुकटचे श्रेय घेणे
हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत
फसवून निसटून जाणे
हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे
किंवा प्राणाचीही पर्वा न करणे
हाय खाणे - धास्ती घेणे
हिंमत न होणे - धैर्य न होणे
हूल देणे - चकवणे
हृदय भरून येणे - अंतःकरण गदगदून
येणे
0 टिप्पण्या