बंब साहेब, यावर बोला.

 


   तीन बातम्या आहेत. 

१) सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवायला देणार. 

२) कमी पटांच्या शाळा बंद करून शाळांची संख्या कमी करणार. 

३) दारूच्या दुकानांची संख्या वाढवणार.

      या तिन्ही बातम्या एकाच वेळी वाचल्यावर फारसे काही बोलायची गरजच उरत नाही. सरकारला राज्यात काय हवे आहे, ते स्पष्टपणे या तीन बातम्यांमधून दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे या तिन्ही बातम्यांवर जनता मूग गिळून बसलेली आहे. बोलत आहेत ते फक्त शिक्षक. कारण शिक्षकांनाच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी आहे. गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण मारण्याचा डाव फक्त शिक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्याच लक्षात आलेला आहे. सामान्य जनतेला फक्त शिक्षकांचे पगार दिसतात. आमदार बंब सारख्या नेत्यांना शिक्षकांचे घर भाडे दिसते. पण गोरगरिबांचे शिक्षण मारणारे सरकारी निर्णय दिसत नाहीत. शिक्षकांच्या घरभाडे भत्त्यावरून रान उठवणारे आमदार बंब आता एका शब्दानेही बोलायला तयार नाहीत. खेडोपाडी पसरलेल्या बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घेऊ नये, पण दारू प्यावी असे बंब साहेबांना वाटते का? हे एकदा त्यांनी स्पष्ट करायला हवे. त्यांना जर खरोखरच बहुजनांच्या शिक्षणाची काळजी असेल तर त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध स्पष्टपणे बोलायला हवे. ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याविरुद्ध रान तापवले होते, त्याच पद्धतीने त्यांनी या सरकारी निर्णयांविरुद्ध रान तापवायला हवे. बंब साहेब, आहे का तुमच्यात ही हिंमत?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या