विद्यालये नव्हे उपक्रमालये!
-भाऊसाहेब चासकर
२० ऑगस्ट हा “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करायचा आदेश आलाय. २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून साजरा करायचाय. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्पर्धांमधून बाहेर येऊन आता कुठं शिकणं-शिकवणं सुरू होत असताना नवे आदेश आलेत. विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा एकदा या सहशालेय उपक्रमांत अडकणार आहेत. शाळांना कोणत्याही इव्हेंटसाठी वेठीला धरले जाऊ नये. अशा शिक्षणेतर उपक्रमांत विद्यार्थी आणि शिक्षकांना गुंतवून ठेवणं हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे. विद्यार्थ्यांना शिकू द्या. शिक्षकांना शिकवू द्या.....
#आम्हाला_शिकवू_द्या
0 टिप्पण्या