आम्हाला शिकवू द्या- ३

 

-भाऊसाहेब चासकर


सरकारांना सरकारी शाळा नकोशा झाल्या आहेत.  पब्लिक फंडेड शिक्षण व्यवस्था नको आहे. सरकारी शाळा बंद करून खासगीकरणाला चरायला शिक्षणाचे कुरण मोकळे करून द्यायचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. 


समाजाला शाळांशी जोडून घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्रयत्नशील असणारे हेच शिक्षक सरकारी शाळांचे खरे सामर्थ्य आहे. खासगीकरणाच्या या वाटेत ताकदीने काम करणारे शिक्षक उभे आहेत. 


संघटना फोडल्या आहेत आधीच. आता सरकारी शाळांचा कणा असलेल्या शिक्षक नावाच्या मजबूत संस्थेला बदनाम केल्याशिवाय खासगीकरण शक्य नाही हे त्यांना समजते. म्हणून शिक्षकांच्या विरोधात बदनामीची मोठी मोहीम उघडली आहे. 


कधी ‘असर रिपोर्ट‘ कधी आणखी कोणी... आणखी काही.... कोणी लिहिते, कोणी बोलते.... सुरूच असते, शिक्षकांचे प्रतिमाभंजन!

आता नवा फतवा काढला आहे म्हणे. जिवंतपणी गुरुजींचे फोटो भिंतीवर लावणार आहेत म्हणे!


शिक्षकांना ढीगभर अशैक्षणिक कामे देऊन त्यात गुंतवून ठेवायचे, त्यांचा शिकवण्याचा वेळ बरबाद करायचा, त्यांची मानसिकता बिघडवून टाकायची आणि दुसरीकडे शिक्षक शिकवत नाही म्हणून अपेक्षित गुणवत्ता नाही असे चित्र रंगवायचे... पालकांच्या अपेक्षा तर वाढलेल्या आहेतच. यात शिक्षकांची गोची करायची आहे. 


प्रशासकीय यंत्रणेची माहितीची राक्षसी भूक काही केल्या संपत नाहीये. शिक्षक मोठी कसरत करत आहेत. शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. आता शिक्षक रस्त्यावर उतरायच्या तयारीत आहेत.

#आम्हाला_शिकवू_द्या


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या