राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

 



       महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे राज्यात अजूनही सर्व ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. संपूर्ण वर्षभर शिक्षण ऑनलाईन स्वरुपात देण्यावरच भर राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर महराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

      या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात 'शाळा बंद शिक्षण चालू' अशी टॅगलाईन घेऊन ऑनलाइन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. संपूर्ण वर्षभर ऑनलाईन शिक्षण चालू होते. परंतु त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाला नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले, त्यातही अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या. 27 जानेवारी 2021 पासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग अर्धवेळ  स्वरूपात सुरू करण्यात आले. तर इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग संपूर्ण वर्षभर सुरुच करता आले नाहीत. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त करणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षणा अधिकार कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट कोणतीही परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे राज्याच्या शालेय शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करून सांगितले. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Online class सुरू असताना सुद्धा फीस पूर्ण चार्ज करणे योग्य आहे का पण शाळा पूर्ण फीस पेड केल्याशिवाय रिपोर्ट कार्ड देत नाही.

    उत्तर द्याहटवा