देशात सध्या ऑनलाईन स्वरुपात शिक्षण चालू आहे. त्याचा लाभ फारच थोड्या विद्यार्थ्यांना होतोय ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपातील अभ्यासातून किती मुलांना समजले, किती प्रमाणात समजले, अशा शंका असतानाच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात का, घेतल्या तर कशा घ्याव्यात असेही प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचबरोबर देशभरात प्राथमिक शाळा सुरु कराव्यात की नाही, केल्या तर कशा कराव्यात याबाबत प्रचंड गोंधळ आहे. असे असताना इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पास करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल राज्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यात इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या राज्यातील विद्यार्थ्यांना आता परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ही अभ्यास न करताच पास होण्याची संधी मिळाली आहे, असे मानले जात आहे. तथापि, पुढील वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे.
0 टिप्पण्या