केंद्र शासनाने इयत्ता ९वी व १०वी चे वर्ग २१ सप्टेंबरला सुरु करण्याची घोषणा केली असली आणि तसे निर्देश राज्यांना दिले असले तरी महाराष्ट्रात मात्र २१ सप्टेंबरला शाळा सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षण संस्था चालक महामंडळाची बैठक घेऊन संस्था चालकांचे मत जाणून घेतले. या बैठकीत २१ सप्टेंबरला शाळा सुरु करण्यास संस्था चालकांनी साफ नकार दिला असून त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेण्यात येईल असे ना. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
२१ सप्टेंबरला ९वी व १०वीचे वर्ग सुरु करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील शिक्षण संस्था चालकांची ऑनलाईन बैठक घेतली. ग्रामीण भागात कोरोनाच्या रुगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालकही मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, असे मत संस्था चालकांनी या बैठकीत मांडले. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होतील हे आता स्पष्ट झाले आहे.
या बैठकीला राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा व शिक्षण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या