शिक्षकांनी संविधानाचा जागल्या व्हावे.- प्रा. सुभाष वारे



 आजचे सर्व प्रश्न संविधानाच्या अपुरेपणामुळे नव्हे तर सत्ताधारी आणि लोकांच्या उदासीनतेमुळे निर्माण झाले आहेत. ही उदासीनता दूर करून राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षकांनी संविधानाचा जागल्या व्हावं,' असं आवाहन प्रा. सुभाष वारे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा राधानगरी, राष्ट्र सेवा दल इचलकरंजी आणि आंतरभारती शिक्षण मंडळ इचलकरंजी यांच्यावतीने आयोजित संविधान संवाद शिक्षक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
      पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक चव्हाण आणि रुचिता पाटील यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने केले. 
    'असे निर्मिले संविधान' या विषयावर बोलताना सुभाष वारे यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठीचा स्वातंत्र्य चळवळीचा आणि संत समाजसुधारकांच्या कामाचा वारसा, त्याचे विविध संदर्भ देत मांडणी केली. संविधान हा काही धर्मग्रंथ नाही, त्यामध्ये बदलला संधी संविधांकर्त्यांनीच दिली आहे. मात्र संविधानाची  मूळ चौकट बदलता येणार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र सर्व लोक समान हे तत्व ज्यांना मान्य नाही असे मूठभर लोक संविधानाला विरोध करत आहेत. संविधान कोणाच्याही विरोधात नाही, हे समजून घेतले पाहिजे. शिक्षकांनी संविधानाचा मूल्य आशय विद्यार्थ्यांमध्ये रुजवला तर संविधानाच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
      राजवैभव शोभा रामचंद्र यांनी स्वागत केले.  संजय रेंदाळकर यांनी प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. आभार हर्षल जाधव यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या