15 जून पासून जरी शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले, तरी कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष शाळा मात्र सुरू झाल्या नाहीत. त्यातही अलीकडे शैक्षणिक वर्ष स्थगित करण्याबाबतच्या चर्चांना ऊत आल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. परंतु या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. 1 सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्यात येतील असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु शिक्षण मात्र ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. टीव्ही, इंटरनेट यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न शासन-प्रशासन यांच्याकडून केला जात आहे. परंतु याचा लाभ खूप कमी विद्यार्थ्यांना होत आहे. शाळेमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून अभ्यास होतो, त्या पद्धतीने घरी अभ्यास होताना दिसत नाही. अनेक पालकांकडे तर या सुविधाच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रचंड नुकसान होत आहे. शाळा सुरू करणे हा त्यावरील उपाय आहे. परंतु कोरोना संसर्गाची भीती लहान मुलांनाच जास्त असल्याने शाळा सुरू करण्याची रिस्क घ्यायला शासन तयार नाही. अनेक पालक ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यातच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक वर्षच स्थगित करण्याबाबत सूचक वक्तव्य केल्याने हे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय? याबाबतच्या चर्चांना ऊत आला. परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी 1 सप्टेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
0 टिप्पण्या