तब्बल १ लाख १८ हजार शिक्षकांनी केली गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी नोंदणी
प्रदीर्घ सुट्ट्यांना विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही कंटाळल्याचे आले समोर
राज्य सरकार आणि 'गुगल क्लासरूम' यांच्या वतीने राज्यातील शिक्षकांना गुगलच्या 'गुगल क्लासरूम' या सुविधेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पत्र काढून राज्यातील शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यातील शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. यासाठी १३ जुुलै रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १,१८,४४४ शिक्षकांनी स्वेच्छेने नोंदणी केली आहे.
'गुगल क्लासरूम' ही गुगलची एक सुविधा आहे. ही वर्गाची इ-प्रतिकृतीच असते. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, वितरण आणि विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना दाखवण्याची सोय ही याची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांना शासनाकडून एक लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जाईल. त्यामुळे शिक्षक आपल्याच विद्यार्थ्यांना आपल्या वर्गात समाविष्ट करून त्यांना शिकवतील. त्यांना वर्गपाठ, गृहपाठ देणे, तो तपासणे शक्य होणार आहे.
आता नोंदणी केलेल्या शिक्षकांकडून उरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. या पद्धतीने राज्यातील सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
2 टिप्पण्या
गुगल क्लासरूम सर्वजन अपडेट राहतील
उत्तर द्याहटवासर्वजण अपडेट राहतील. खर्या अर्थानं दरूजेद
उत्तर द्याहटवा