दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यापासून शालेय कामकाजाचे दिवस बघितले तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की,
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातला एक मोठा अडसर बनला आहे, होता. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरून सुचवलेल्या भारंभार स्पर्धा आणि विशेष दिवस साजरे करताना शिक्षक आणि विद्यार्थी यांना मोठी कसरत करावी लागली. दमछाक झाली. उदंड झालेले हे उपक्रम शिकण्या-शिकवण्याचा महत्त्वाचा वेळ खाऊन टाकतात. आणि विशेष गंभीर बाब ही की, ही सगळी थेरं फक्त आणि फक्त सरकारी शाळांमध्ये सुरू असतात. ‘हक्काचा क्राऊड‘ म्हणून शासन-प्रशासन या मुलांकडे बघते. हेच मोठं दुर्दैव. लेखी, तोंडी किंवा केवळ समाजमाध्यमांतून सांगितलं की शिक्षक ऐकतात, हा विश्वास प्रशासकीय यंत्रणेला वाटतो! शिक्षक कशाला नाही म्हणत नाहीत! तशी सोय ठेवलेली नसते म्हणा!!
वर्षभर येणारे विशेष दिवस साजरे करणे, जयंत्या मयंत्या साजऱ्या करणे, गावातले म्हणून काही सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम असतात. याखेरीज तालुका आणि जिल्हा पातळीवरील आदेश येत असतातच, शिवाय शाळांचे स्वतःच्या म्हणून काही गोष्टी असतात...
अमृतमहोत्सव स्पर्धा.
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती डॉक्युमेंट्स.
त्यासाठी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडायची.
आधार अपडेट करणे अत्यंत त्रासदायक काम ठरत आहे. पोर्टलवर आधार लिंक नसेल तर संच मान्यता करताना विद्यार्थी कमी दिसणार!
सगळ्याचा वैताग विचारू नका भौ.
हे सगळे थांबवायला हवे. मुलांना शिकायला मिळाले पाहिजे. शिक्षकांना शिकवू दिलं पाहिजे.
कोण थांबवू शकेल ?
#आम्हाला_शिकवू_द्या
0 टिप्पण्या