ऑगस्ट महिन्यातही शाळांना सुटीच

       
    ऑगस्ट महिन्यातही शाळा बंदच राहणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना विषाणू-संसर्गाच्या वाढत्या केसेस पाहता ऑगस्ट महिन्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आधीच्या नियोजनानुसार ऑगस्ट महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे नियोजन शासनाने केले होते. परंतु कोरोन बाधित लोकांची वाढती संख्या पाहता ऑगस्टमध्ये शाळा सुरू करणे धोक्याचे आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे समजते. कोरोनाचे संकट असेच कायम राहिले तर तर फक्त १२० दिवस शाळा भरवण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. 
    ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाची स्थिती कशी राहते यावर शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय अवलंबून आहे. शाळा लवकर सुरू झाल्या नाहीत तर ऑनलाईन शिक्षणावर मुख्य भर दिला जाणार आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणातही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

11 टिप्पण्या

  1. ग्रामीण भागात बरेच पालक यांच्याकडे मोबाईल आहे पण नेट सुविधा नाही.३०%पालक यांच्याकडे मोबाईल, टेव्ही,रेडिओ, या सुविधा नाही. अॉनलाईन अभ्यासक्रम करणे अवघड परिस्थिती आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. पालकांना परीक्षा कशी होणार, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रमात कशा पद्धतीने येणार याची चिंता .

    उत्तर द्याहटवा
  3. सत्र 2019-20 मध्ये प्रथम सत्रातील परीक्षा वरून निकाल लावण्यात आला तसेच सत्र 2020 -21 मध्ये पण दुतिय( सेकंड)सत्र गाह्य धरून निकाल देण्यात यावा

    उत्तर द्याहटवा
  4. एका दिवशी एक वर्ग याप्रमाणे जर घेता आले तर बघा म्हणा। आमचे विद्यार्थी तर ऑनलाईन दिलेला अभ्यास करत नाही। रोज पालकांना फोन करून सांगितले तरी।
    ते म्हणतात मुलं ऐकतच नाही।
    आमचा जीव कासावीस होतो हो,मुलांचं कस म्हणून

    उत्तर द्याहटवा
  5. भारताने अमेरिकेसारखं शैक्षणिक धोरण जाहीर केले पाहिजे म्हणजेच सन 2020-21शैक्षणिक वर्ष गॅप देऊन आॅनलाईन शिक्षण बंद करावे.हे वर्ष फक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.कोणत्याही सत्रावरुन निकाल जाहीर केला तरी विद्यार्थ्यांचे चुकीचे मुल्यमापन होईल.

    उत्तर द्याहटवा
  6. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी अद्याप एकही करुणा पेशंट नाही आहे अशा भागांमध्ये शिक्षकांना काही दिवस सदर ठिकाणी स्थानिक राहणे बंधनकारक करून शाळा सुरू करण्यात याव्यात असे मला वाटते कारण की जरी शाळा बंद असतील परंतु ग्रामीण भागातील बहुतेक लोक हे शहरी भागात आज देखील येजा करतच आहेत कधी शेतीच्या खरेदी निमित्त तर कधी बँकेत कधी विविध शासकीय योजना निमित्त अशा परिस्थितीत देखील कोरोणा संसर्ग हा त्यांना होऊ शकतो हे नाकारता येणार नाही


    मग आज खेडोपाडी दुर्गम भागात मोठ्या शहर वस्तीपासून जरा दूर अंतरावर ज्या वाड्या वस्त्या आहेत तेथे शाळा सुरू करण्यास हरकत नाही असे मला तरी वाटते

    उत्तर द्याहटवा
  7. एक एका दिवशी एक वर्ग सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करून व इतर प्रतीबंधक उपाय वापरून तसेच जेथे संसर्ग नाही तेथे शाळा सुरू कराव्यात

    उत्तर द्याहटवा
  8. 2020-21 हे शैक्षणिक वर्ष रद्द करण्यात आले तर विद्यार्थ्यांना promot पण करू नये आणि पुडचा वर्षी std 1st मध्ये जाणाऱ्या मुलांचं 6 ऐवजी 7व्या वर्षी admission करावे. मंजे पुदचा वर्षी नवीन admission होणार नाही.आणि कोणीही disturb होणार नाही.

    उत्तर द्याहटवा